बीड : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्यावर एनएसआय कानपूर, ऍडव्हान्टा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक प्रकल्प अंतर्गत गोड ज्वारी लागवड प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी अॅडव्हान्टा कंपनीचे प्रतिनिधी पांडुरंग पाटील यांनी गोड ज्वारी लागवडी विषयी माहिती दिली. ज्वारी लागवड पद्धत, कीड व रोग नियंत्रण, अंतर मशागत तसेच पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती यावेळी देण्यात आली.
जय महेश कारखान्याचे जनरल मॅनेजर पारसनाथ जयस्वाल यांनी गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती याबाबत तसेच या ज्वारीपासून शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळते हे पीक ९० ते १०० दिवसांचेच असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले. दत्तात्रय आहेरकर, ऊस पुरवठा अधिकारी रामभाऊ सोळंके, भास्कर फपाळ यांनीही गोड ज्वारी लागवडी संदर्भातील माहिती शेतकऱ्यांना दिली.











