बीड : ऊस दरासाठी तीस ग्रामपंचायती एकवटल्या, तहसीलदारांना निवेदन

बीड : वडवणी तालुक्यातील ३५ पैकी ३० ग्रामपंचायतींनी ऊस दर आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सद्यस्थितीत ऊस उत्पादनाचा खर्च अत्यंत वाढलेला असताना कारखानदारांकडून कोणताही दर जाहीर करण्यात आलेला नाही. याचा तीव्र निषेध ३० ग्रामपंचायतींनी केला. मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत कोयता बंद, ऊस वाहतूक बंद आणि क्रशिंग बंद या आंदोलनास तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींनी बहुमताने पाठिंबा जाहीर केला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला दरवाढ देण्यात यावी व भाव निश्चित करावा, अशी मागणी करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक गावांतील ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी तहसीलदारांमार्फत राज्याच्या सहकार मंत्र्यांना निवेदने पाठवण्यात आली आहेत. शेतकरी नेते अजय बुरांडे, गंगाभिषण थावरे, दत्ताजी डाके, अजय राऊत, ओम पुरी, जगदीश फरताडे व युवा नेते संजय आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. ऊसतोड कामगार, शेतकरी, ऊस वाहन मालकांना बंदमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी तात्काळ ऊस दरवाढ जाहीर न केल्यास हे आंदोलन उग्र होऊ शकते, असे शेतकरी नेते जगदीश फरताडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here