बेळगाव : शिवशक्ती शुगर्सकडून १८ लाख टन ऊस गाळप – अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे

बेळगाव : रायबाग तालुक्यातील सौंदत्ती-यड्राव येथील शिवशक्ती शुगर्सने यंदाच्या गाळप हंगामात १८ लाख टन विक्रमी ऊस गाळप केले आहे, अशी माहिती सी. बी. कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी दिली. शिवशक्ती शुगर्स परिसरात आयोजित यंदाच्या ऊस गाळप हंगाम सांगता समारंभ आणि ऊस पुरवठा व ऊस तोडणी कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कोरे म्हणाले, कारखान्यावर विश्वास दाखवत शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे. कामगारांनीही परिश्रम घेतले आहेत. सर्वांच्या सहकार्याने कारखान्याने १८ लाख टन ऊस गाळप करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

सन २०२५-२६ हंगामातील उसाचे गाळप खडतर असताना व ऊस तोडणी कामगारांची कमतरता असूनही साखर कारखान्याने यंदा १८ लाख टन उसाचे गाळप करून विक्रम केला आहे. सर्व कामगारांच्या परिश्रमामुळेच हे शक्य झाले आहे. आगामी काळातही साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवून अधिक ऊस गाळप करण्याची तयारी केली जाणार आहे, असे पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे शेतकरी लक्ष्मण बानगर आणि गणपती कुंभार यांना बक्षीस देण्यात आले. साखर कारखान्याच्या विभागानुसार ऊस वाहतूकदार, वाहन वाहतूकदार, टी. सी. कार्ड आणि ट्रॅक्टर मालकांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस स्टोव्ह, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.कार्यक्रमास कोरे कारखान्याचे उपाध्यक्ष टी. डी. काटे, संचालक भरत बनवणे, अजित देसाई, मल्लाप्पा म्हैशाळे, चेतन पाटील, अण्णासाहेब पाटील, व्ही. जे. रवी, विजय पाटील, महावीर कात्राळे, बी. एस. मुधोळे, संतोष कारेन्नवर, बी. ए. पाटील, एस. पी. निप्पाणी, एस. एस. यादव, केशव प्रसाद, पांडू बडगन्नवर, एन. एस. मुल्ला, ल यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here