बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात ३०० रोपांची लागवड

बेळगाव : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात जागतिक पर्यावरणदिनी ३०० रोपांची लागवड करण्यात आली. जोल्ले ग्रुपचे उपकार्याध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी कारखाना आवारात यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. हालसिद्धनाथ कारखान्यामध्ये माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असताना वृक्ष लागवडीसह उद्यान सुशोभीकरणाला तितकेच महत्व दिले आहे. पर्यावरणदिनी ३०० रोपांची लागवड केली आहे. उद्यान सुशोभीकरणातून कारखान्याच्या सौंदर्यात अजून भर पडणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील म्हणाले, कारखान्यातील उद्यान विकासासह वृक्षसंवर्धनाला गती आली आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here