बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी बिनव्याजी चार लाख रुपये देण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात भागातील १० ऊस ओढणी कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना धनादेशाचे वितरण केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली. प्रथम तोडणी वाहतूक कंत्राटदाराकडे धनादेशाचे वितरण झाले. एम. पी. पाटील म्हणाले, भागातील गरीब ऊसतोड मजुरांचा स्वःताचा ट्रॅक्टर असावा, कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतुकीचे काम देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी जोल्ले दाम्पत्याने हे कार्य हाती घेतले आहे. नवीन ऊस तोड मजुरांची संख्या वाढावी हा त्यामागे उद्देश आहे.
उपाध्यक्ष पवन पाटील म्हणाले, कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करार झाला असून अगाऊ रक्कम दिली आहे. ज्या स्थानिक तरुणांना ऊसतोड मजूर कामाची इच्छा आहे, अशांना कारखाना सहकार्य करेल. सभासदांनी ऊस पिकाची नोंद करावी. कार्यक्रमास संचालक अप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, समित सासणे, विनायक पाटील, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, श्रीकांत बन्ने, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, जयकुमार खोत, युनुस मुल्लाणी, श्रीकांत कणंगले, सर्जेराव पाटील, किरण निकाडे, सिद्धू नराटे, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे, अनिल पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. नामदेव बन्ने यांनी आभार मानले.