बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे अक्कोळ (ता. निपाणी) येथे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद घेण्यात आला. यावेळी कमी क्षेत्रात अधिक ऊस उत्पादन घेण्याचे तंत्र अवलंबण्याचे आवाहन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी केले. ते म्हणाले की, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हालसिद्धनाथ कारखान्याची घोडदौड सुरू आहे.
कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विविध सुविधा, योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. यावेळी विश्वजित पाटील यांनी ऊस उत्पादन वाढीबद्दल तंत्रशुद्ध माहिती उपस्थितांना दिली. संचालक सुहास घुगे यांनी यंदा स्थानिक टोळ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संचालक रावसाहेब फराळे होते. निरंजन कमते यांनी ऊस विकास योजनेचे कौतुक केले. सुदर्शन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राम नारायण कुलकर्णी (सरकार), बापूसाहेब कटीकल्ले, सचिन कोरे, विकास संकपाळ, आप्पा सोळांकुरे, सचिन जाधव, सुदर्शन जाधव, आर. डी. सासणे, महेश मलाबादे, विजय पाटील, पी. बी. पाटील, विजय भदरगडे, शरद बन्ने यांनी परिश्रम घेतले.