बेळगाव (कर्नाटक) : यंदाच्या २०२५- २६ च्या हंगामात गळितास येणाऱ्या उसाला दोन हप्त्यात प्रतिटन ३३०० रुपये ऊस दर देण्याची घोषणा केली होती. मात्र संचालक मंडळाने ऊस उत्पादक व शेतकरी हिताचा विचार करून पुन्हा ६० रुपये प्रतिटन वाढवून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हालसिध्दनाथ यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकूण ३३६० रुपये दर देईल, असे येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सांगितले.
अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याचे मार्गदर्शक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने केलेली दरवाढ ही कर्नाटकातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी आहे. यंदाही कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करावे.
यावेळी उपाध्यक्ष पवन पाटील, संचालक अप्पासाहेब जोल्ले, सुकुमार पाटील-बुदिहाळकर, विश्वनाथ कमते, प्रकाश शिंदे, समीत सासणे, रामगोंडा पाटील, जयवंत भाटले, जयकुमार खोत, रमेश पाटील, किरण निकाडे, आनंदा यादव, सुहास गुग्गे, रावसाहेब फराळे, श्रीकांत बन्ने, शरद जंगटे, भरत नसलापुरे, आर. एल. चौगुले, देवाप्पा देवकाते, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे, नामदेव बन्ने यांच्यासह संचालक, अधिकारी उपस्थित होते.


















