बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्यासह उपाध्यक्ष पवन पाटील व संचालकांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. कारखान्याची दैनिक ऊस गाळप क्षमता ८ हजार ५०० वरुन ११ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या ३९ व्या ऊस गाळप हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे. गाळप क्षमता वाढणार असल्याने ऊस तोडणी वेळेवर होईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, सध्या कारखान्याचे सर्व बाबतीत आधुनिकीकरण झाल्याने कारखाना विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येणारा हंगामा यशस्वी होण्यासाठी तांत्रिक व इतर बाबतीत चांगली तयारी सुरु आहे. संचालक श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष पवन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून कारखान्यातील कामकाजाचा आढावा घेतला. संचालक अप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, महालिंग कोठीवाले, जयकुमार खोत, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, विनायक पाटील, शरद जंगटे, रमेश पाटील, अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, समीत ससाणे, रावसाहेब फराळे, यूनूस मुल्लाणी, श्रीकांत कणंगले, सुनील पाटील, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे आदी उपस्थित होते. गजानन रामनकट्टी यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यांनी आभार मानले.