बेळगाव : मार्कंडेय साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक रद्द

बेळगाव : मार्कंडेय साखर कारखाना चालविण्यास देण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी, दि. १३ जून रोजी दुपारी तीन वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळातील एका सदस्याने सकाळी सात वाजताच संचालक मंडळाच्या सोशल मीडियावरून मेसेज करून १६ जूनला उपाध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने बैठक घेऊ नये, अशी मागणी केली. त्यानंतर कोणतेही सबळ कारण नसताना केवळ एका संचालकाच्या मागणीवर शुक्रवारी (ता. १२) आयोजित केलेली बैठक रद्द करण्यात आली.

मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक आणि सुकाणू समितीची नऊ जूनला बैठक झाली होती. साखर कारखाना संचालक मंडळाची बैठक बोलविण्यास अनास्था दाखविली जात आहे. पुढील बैठक कधी होणार? हे जाहीर केलेले नाही. २०२३ च्या हंगामातील उत्पादित साखरेचे काय झाले ?, नफा किती आणि तोटा किती ?, याची माहितीदेखील अर्धवट राहिली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा मुद्दादेखील पुन्हा चर्चेला येणार आहे. ज्याचे उत्तर अध्यक्षांकडून संचालकांना अपेक्षित आहे. एका सदस्याने अचानक बैठक रद्द करायला लावली. त्यानंतर संचालक मंडळातील अनेक सदस्य बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले गेले. याची उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here