बेळगाव : वेदगंगा शेतकरी सहकारी संघाकडून शेतकऱ्यांना ड्रोन, ऊस तोडणी यंत्र सुविधा

बेळगाव : वेदगंगा निपाणी शेतकरी उत्पादक सहकारी (एफपीओ) संघाकडून शेतकऱ्यांसाठी ऊस तोडणी यंत्र, ड्रोनव्दारे औषध फवारणीसह विविध आधुनिक अवजारे, खते- बियाणे सवलतीच्या दरात पुरविली जात आहेत. याशिवाय ताडपत्री, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॉली आदी सुविधा दिल्या आहेत, अशी माहिती संघाचे कार्यकारी संचालक सिध्दू नराटे यांनी दिली. संघाची नुकतीच पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार शशिकला जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यकारी संचालक नराटे म्हणाले कि, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार जोल्ले यांच्यामुळे या संघाची स्थापना झाली. तसेच सध्या १,४३० सभासद, १४,३०,००० रुपये भागभांडवल आहे, असे सांगितले. तर संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पीएमएफएमई योजनेची अंमलबजावणी केली आहे. यामुळे महिलांनी बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली आहे असे आमदार जोल्ले यांनी सांगितले. निरंजन कमते यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस नगराध्यक्षा सोनल कोठडिया, उपनगराध्यक्ष संतोष कोठडिया, महालिंग कोठीवाले, एस. एस. ढवणे, राजू गुंदेशा, दिलीप चव्हाण, सिध्दगौडा पाटील, सर्जेराव पाटील, संदीप सदावर्ते, किशोर हरदारे, काकासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here