भारती शुगर्सच्या मिल रोलरचे पूजन, गाळप क्षमता वाढविण्यासाठी विस्तारीकरण : महेंद्र लाड

सांगली : नागेवाडीच्या भारती शुगर्स अँड फ्यूएल्स कारखान्याच्या सन २०२५ २६ गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक रोहन लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

महेंद्र लाड म्हणाले, येणाऱ्या गळीत हंगामात आपण जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारखान्याची क्षमता वाढवण्यासाठी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी नोंदी करून जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही महेंद्र लाड यांनी केले. यावेळी मुख्य अभियंता एम. एस. पाटील, व्ही. पी. सूर्यवंशी, श्रीपती शुगरचे मुख्य व्यवस्थापक एम. पी. जोशी, शेती अधिकारी एस. जे. मोहिते, ए. ए. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक पी. डी. सुतार, विक्री अधिकारी ए. ए. स्वामी, उप अभियंता आर. ए. चव्हाण, ए. टी. कांबळे, एस. ए. जाधव, वीज अभियंता पी. एन. पाटील, घानवडचे सरपंच प्रवीण रावताळे, नागेवाडीचे सरपंच सतिश निकम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here