कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याने यंदा राज्यात उच्चांकी ३,६५३ रुपये प्रति टन दर जाहीर केला असून, राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला आहे. या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊस दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आता हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे. शेतकरी संघटनांच्या दबावानंतर साखर कारखान्यांकडून दर जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ३ हजार ६५३ रुपये प्रति टन उस दर जाहीर केला आहे. चेअरमन शिवाजीराव पाटील व संचालक मंडळ भोगावती सह.साखर कारखाना यांनी घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.












