बिहार : राज्यातील शेतकऱ्यांना ९१ टक्के ऊस बिले अदा, हंगाम अंतिम टप्प्यात

पाटणा : राज्यातील साखर कारखानदारांनी गळीत हंगामाची समाप्ती होण्यापूर्वीच शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसाच्या किमतीपैकी ९१ टक्के रक्कम अदा केली आहे. ऊस उद्योग विभागाने कारखानदारांना उर्वरित थकबाकी त्वरित देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांकडून कारखानदारांनी ५६७.२० लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. याचे एकूण मूल्य अंदाजे २११०८०.३२ लाख रुपये आहे. या उसापोटी आतापर्यंत साखर कारखानदारांनी १२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना अंदाजे १९१८२३.९९ लाख रुपये दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. साखर कारखान्यांनी उसाच्या किमतीच्या ९१ टक्क्यांहून अधिक रक्कम दिली आहे, अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली.

राज्यातील सर्व कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी तात्काळ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे साखर आयुक्तांनी सांगितले. विभागाच्या नोंदीनुसार, २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू होताच राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करण्यास सुरुवात केली. हरिनगर शुगर मिलने सर्वाधिक ऊस खरेदी केला, त्याखालोखाल नरकटियागंज शुगर मिल आणि बागाहा शुगर मिल यांचा क्रमांक लागतो. हरिनगर शुगर मिलने १२७.८० लाख क्विंटल, बागाहाने ८१.०८ लाख क्विंटल, नरकटियागंजने ९९.७८ लाख क्विंटल, मझौलियाने ५३.७९ लाख क्विंटल, हसनपूरने ४४.९५ लाख क्विंटल, सिधवालियाने ४४.५१ लाख क्विंटल, गोपालगंजने ३३.८२ लाख क्विंटल, लौरियाने ३२.४७ लाख क्विंटल, सुगौलीने २७.९८ लाख क्विंटल, तर रिगा शुगर मिलने १७.४८ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. तर प्रतापपूर शुगर मिलने सिवानच्या शेतकऱ्यांकडून ३.५८ लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here