बिहार : ऊस उत्पादकता वाढीसाठी साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

हसनपूर : हसनपूर साखर कारखाना परिसरातील कोराई गावात मुख्यमंत्री ऊस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत हसनपूर साखर कारखाना आणि ऊस विकास समस्तीपूर येथील सहाय्यक संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी नव्या तंत्रज्ञानाने ऊस लागवड करण्याबाबत माहिती देण्यात आली. शास्त्रज्ञांनी ऊस पिकासाठीचे यांत्रिकीकरण, ऊस बांधणीबाबत माहिती दिली. सिंचन आणि यांत्रिकीकरणाचे महत्त्व, पोषक तत्वांचे व्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांचा वापर, उसाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्याचे मार्ग स्पष्ट करण्यात आले. कीटकनाशके आणि युरियाच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली.

‘हिंदूस्थान’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाचे उपमहाव्यवस्थापक रामशंकर प्रसाद यांनी उसाची उत्पादकता वाढवण्याबद्दल आणि खर्च कमी करण्याबद्दल सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांना शक्य तितक्या जास्त क्षेत्रात ऊस लागवड करण्याचे आवाहन केले. समस्तीपूर ऊस विकास समितीचे सहाय्यक संचालक तथा उपसंचालक धर्मवीर सिंह यांनी सरकारच्या ऊस उद्योग विभागाकडून ऊस विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. प्रादेशिक ऊस विकास अधिकारी मनोजकुमार महतो, सार्थक तिवारी, दीपक कुमार चौधरी, रणजित कुमार, विपुल कुमार, रजनीश कुमार, नितीशकुमार, बिपीनकुमार राय, सतपाल कुमार, सुधीर कुमार शाही, रणधीर कुमार सिंग, साहेब सिंग, राजेंद्र यादव, नंदवली यादव, अखिल यादव, अखिल कुमार सिंह, सुधीर कुमार सिंह, सुधीर कुमार, अभयकुमार यादव, अरविंद यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here