पुणे : भारत आयात कच्च्या तेलावर खूप अवलंबून आहे आणि स्वदेशी रुपात निर्मिती केलेल्या जैव इंधनाचा वापर करुन देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवणे आणि नेट झीरोचे उद्दिष्ट गाठण्यास मदत मिळेल असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे (आईओसीएल) अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २०२५ पर्यं २० % पर्यंत पोहोचेल. आणि आम्ही आता आक्रमक रुपात डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याची गरज आहे. यातून हानीकारक ऑटो उत्सर्जन रोखणे आणि तेल आयातीमुळे देशाच्या वाढत्या परकीय चलनाच्या बिलाला कमी करण्याचा एक दिर्घकालीन मार्ग आहे. ते प्राज मॅट्रिक्सला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
वैद्य म्हणाले की, भारत सरकारच्या जैव इंधन कार्यक्रमाने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करण्यास मदत मिळाली आहे. आयओसीएल हरित विकासासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही नेट झीरो कार्बन उत्सर्जनासाठी २०४६ चे लक्ष्य निश्चित केले आहे.
ते म्हणाले की, विमान क्षेत्राचे डिकार्बोनायझेशनसाठी पारंपरिक जेट इंधनासह ड्रॉप-इन ईंधनाच्या रुपात सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (SAF) चा वापर करण्याबाबत एअरलाइन्स उद्योगात रुची वाढली आहे. आम्ही CORSIA (कार्बन ऑफसेटिंग आणि रिडक्शन स्कीम) पूर्ण करण्यासाठी SAF क्षमता वाढविण्याच्या दिशेने काम करीत आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ओपेकचे तेल उत्पादन धोरणासोबत नाजूक भू-राजकीय स्थिती पाहता ही एक मोठी उपलब्धी आहे.
प्राजद्वारे जैव इंधन तंत्रज्ञानात करण्यात आलेल्या प्रगतीचे कौतुक करताना त्यांनी संशोधकांना काही बाबी विकसित करण्याचे आवाहन केले की, जे प्राथमिक रुपात इथेनॉल आणि डिझेलचे मिश्रण बनवण्यास मदत करतील. यावेळी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अनिर्बान घोष आणि मॅथ्यू वर्गिस आदी यावेळी उपस्थित होते.












