नजीबाबाद : नजीबाबाद शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या क्षमता वाढीची मागणी करताना भाकियूच्या शिष्टमंडळाने साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे यांची भेट घेतली. त्यांनी कार्यकारी संचालकांना निवेदन देवून लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी असे आवाहन केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियूचे मंडल अध्यक्ष बाबूराम तोमर आणि युवा जिल्हाध्यक्ष वरुण गुर्जर यांनी लखनौमध्ये साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे यांची भेट घेतली. बाबूराम तोमर म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहा वर्षापूर्वी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. कारखाना दररोज केवळ २८ ते ३० हजार क्विंटल उसाचे गाळप करतो. मात्र, शेतकऱ्यांकडे त्याच्या दुप्पट ऊस शिल्लक असतो. कारखान्यात लवकर गाळप होत नसल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस क्रशर आणि गुऱ्हाळघरांना विकावा लागत आहे. जर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली नाही, तर भाकियूचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला.


















