पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांत अनेक प्रकारचे तांदळाचे पीक घेतले जाते. यामध्ये बासमतीसह अमन आणि औस अशा वेगळ्याच तांदळाच्या जातींचा समावेश आहे. या तांदळाला स्वतःची वेगळी चव आणि सुगंध आहे. या सर्व जाती केवळ दैनंदिन जेवण आणि सणांसाठीच नव्हे तर निर्यातीसाठीदेखील आवश्यक आहेत. बंगाली तांदूळ त्याच्या अद्वितीय चवीसाठी प्रसिद्ध आहे. या राज्यातील बर्दवान जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जात आहे. येथील नैसर्गिक संसाधने वर्षभर भात लागवडीसाठी अनुकूल स्थिती देतात. त्यामुळे हा जिल्हा देशातील सर्वात मोठ्या तांदूळ उत्पादक प्रदेशांपैकी एक बनला आहे.
बर्दवान तांदूळ वाढत्या उत्पादनामुळे आणि चांगल्या गुणवत्तेमुळे अन्न सुरक्षा, ग्रामीण समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. त्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्वापलीकडे, तांदळाची लागवड या जिल्ह्यातील असंख्य कुटुंबांना उपजीविका प्रदान करते. येथील शेतकरी पिढ्यानपिढ्या लागवडीपासून ते कापणीपर्यंत केवळ भातावर अवलंबून आहेत. पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी अंदाजे १५ दशलक्ष टन तांदळाचे उत्पादन हते. देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनात हा वाटा महत्त्वपूर्ण आहे. गंगा डेल्टा हा जगातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक मानला जातो. पश्चिम बंगालमधील तांदूळ हे केवळ कृषी उत्पादन नाही तर स्थानिक संस्कृती आणि पाककृतीचा एक भाग आहे. येथील तांदूळ या प्रदेशाची पाककृती ओळख प्रतिबिंबित करतो. तांदूळ उत्पादनातून येथील लोकांना रोजगार मिळतो.