नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मे २०२५ साठी २३.५ लाख मे. टन साखर विक्री कोटा जाहीर केला. विशेषतः मेमध्ये साखरेला नेहमीपेक्षा जादा मागणी असते. थंड पेये, आइस्क्रिम आदी उत्पादनासाठी साखरेची जादा मागणी असते. शिवाय लग्न समारंभ व अन्य कारणासाठीही साखरेच्या मागणीत वाढ होते.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) मे २०२४ साठी देशांतर्गत विक्रीसाठी २७ लाख मेट्रिक टन (LMT) साखर विक्री कोटा दिला होता. एप्रिल २०२४ मध्ये वाटप केलेल्या २५ लाख मेट्रिक टन आणि मे २०२३ मध्ये २४ लाख मेट्रिक टन साखरेच्या तुलनेत ही वाढ होती. ज्याचा उद्देश उन्हाळ्यातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि बाजारभाव स्थिर करणे हा होता. यंदा मी महिन्यात जाहीर केलेला कोटा मे २०२४ च्या तुलनेत ३.५ लाख मे.टनाने कमी आहे. ‘चीनीमंडी’शी बोलताना साखर उद्योगाचे ज्येष्ठ अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले कि, माहे मे २०२५ साठी दिलेला कोटा गतसालापेक्षा कमी असलेने व मे महिन्यात साखरेला बाजारातून जादा मागणी येत असलेने साखरेच्या दरात ₹ १०० ते १५० प्रति क्विंटल वाढ हेाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो.