छत्रपती संभाजीनगर : धामोरी बुद्रुक (ता. गंगापूर) येथील मुक्तेश्वर साखर कारखान्यातर्फे गंगापूर, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर साखरेचे वाटप सुरू करण्यात आले. ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ, मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर, अभियंता प्रमोद काळे आदींच्या हस्ते हा उपक्रम सुरू झाला. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना साखरेचे वितरण करण्यात येत आहे. कारखान्यातर्फे गंगापूर, ढोरेगाव, वाळूज, शेकटा व कारखाना साइट या पाच ठिकाणांवरून साखर वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, कारखान्याने इतरांप्रमाणे शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसाला प्रतिटन २०० ते २५० रुपये देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी किसान मोर्चा तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वल्ले यांनी केली. मुक्तेश्वर साखर कारखाना नेहमीच शेतकरी-कामगारांचे हित जोपासणारा काम कारखाना म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या साखरेबद्दल कारखाना प्रशासनाचे आभार मानले. आप्पासाहेब सोनवणे, किरण सरोदे, रामेश्वर म्हस्के, ताराचंद शिंदे, राहुल पानकडे, योगेश आदमाने, राजू गायकवाड, राहुल ढोले, संतोष कुंदे, विठ्ठल टेके, विष्णू शेळके, दीपक शेवाळे, विठ्ठल काळे, बाळू मोरे, शंकर टेके, सचिन उबाळे, विलास सूर्यवंशी, नितीन बोरुडे आदी उपस्थित होते.