छत्रपती संभाजीनगर : रेणुकादेवी-शरद कारखान्यात आतापर्यंत अडीच लाख टन ऊस गाळप

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद अवस्थेत असलेला चौढाळा येथील रेणुकादेवी – शरद कारखाना खासदार संदीपान भुमरे यांनी सुरू करून या परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक सभासद यांना मोठा दिलासा दिला आहे. हंगामाच्या दोन महिन्यांत कारखान्याने तब्बल अडीच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. कारखान्याचे चेअरमन दत्तात्रय रेवडकर यांनी ही माहिती दिली.

चेअरमन रेवडकर म्हणाले की, यंदा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ऊस गाळप हंगाम सुरू झाला. कारखान्याने ६ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून १ लाख ३६ हजार साखरेची पोती उत्पादित केली आहेत. यंदाच्या हंगामात कारखान्याने ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे. गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी संचालक नामदेव रेवडकर, दासू रेवडकर, जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील, रमेश झिरपे, सचिन आसवे, सोमनाथ मुळे, श्रीमंत टेकाळे, महेश ढालपे, राजेंद्र चौधरी, दिनकर औताडे, अशोक शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here