देशातील पहिले आधुनिक पद्धतीने साखर बनविणाऱ्या युनिट चे काम सुरु

कानपूर :आधुनिक पद्धतीने रिफाइंड साखर बनवणारे देशातील पहिल्या युनिटची निर्मिती सुरु झाली आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थानामध्ये उभ्या राहणार्‍या या युनिटमध्ये रोज दहा टन साखरेचे उत्पादन केले जाईल. हे युनिट प्रत्येक दिवशी दहापटीने वीज देखील वाचवेल. दिल्लीतील केमिकल सिस्टम्स टेक्नॉलॉजीच्या वतीने हे युनिट उभे केले जात आहे. हे युनिट 15 जानेवारी 2020 पर्यंत तयार होईल. जानेवारीच्या अखेरीला उत्पादन सुरु करण्याचे ध्येय आहे.

एनएसआय मध्ये स्थापन होणार्‍या या युनिटमध्ये दोन पद्धतींचा वापर करण्यात येईल. यामध्ये एका पद्धतीत आयन एक्सचेंज रेजिंस व डीप बेड फिल्टर तर दुसर्‍या पद्धतीत, अ‍ॅक्टिव कार्बन आणि मेंब्रेन फिल्ट्रेशन चा वापर केला जाईल. एनएसआय चे संचालक प्रा. नरेंद्र मोहन म्हणाले, “या दोन्हीही पद्धतींचा एकत्र वापर आजपर्यंत देशातील कुठल्याही रिफायनरीमध्ये केला गेला नाही. अडीच करोडच्या या शुगर रिफायइनरी मध्ये आधुनिक प्रक्रिया पद्धत आणि उच्च दर्जाची प्रक्रिया उपकरणांचा वापर केला जाणार आहे.

हे देशातील पहिलेच असे रिफाइंड साखर बनवणारे युनिट असेल, ज्यामध्ये डि-कलरायजेशनची दोन वेगवेगळी आधुनिक पद्धतीची उपकरणे लावण्यात येणार आहेत. अशा प्रकारची साखर बनवण्यात पहिल्या टप्प्यात ऊसाच्या रसापासून साखर उत्पादन केले जाईल. दुसर्‍या टप्प्यात या साखरेला रिफाइंड शुगर मध्ये रुपांतरित करण्यात येईल. या प्रक्रिये अंतर्गत कच्च्या साखरेचा घोल बनवून त्याला चुना आणि फॉस्फोरिक अ‍ॅसिड नेे साफ केले जाईल. यानंतर त्याला रंगहीन आणि क्रिस्टलीकरण करुन रिफाईंड बनवले जाईल.

प्रा. नरेंद्र मोहन म्हणाले की, या युनिटच्या स्थापनेमध्ये पर्यावरणाचेही भान जपले आहे. सामान्य रिफाइनरीच्या तुलनेत हे युनिट जवळपास दहा पट विज वाचवेल. सामान्य रिफाइनरी मध्ये प्रति टन 30 किलोवॅट वीज खर्च होते, तर या युनिटमध्ये 27 किलोवॅट विजेचा वापर होईल.

Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here