उत्पादनात सातत्य, शाश्वत ऊस दर आणि सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य : माजी मंत्री राजेश टोपे

जालना : उत्पादनात सातत्य, शाश्वत ऊस दर आणि शेतकरी, सभासदांची आर्थिक उन्नती साधने, यालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मत माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या ४३ व्या वार्षिक अधिमंडळ सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिशा टोपे होत्या.

यावेळी समुहाचे मार्गदर्शक, माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कारखान्याला ‘अ’ श्रेणी ऑडिट वर्ग मिळाला असून एकूण १२ लाख मे. टन ऊस गाळप झाले. युनिट नं.१ व २ मध्ये अनुक्रमे ३.४८ व १.५४ कोटी बल्क लीटर अल्कोहोल, तसेच ३.३२ व १.२८ कोटी बल्क लीटर इथेनॉल उत्पादन झाले, ऊस उत्पादकांना २ हजार ८३२ रुपये प्रति मे.टन अंतिम दर दिला आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि परिसराचा विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.

कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी. टी.पावसे, कार्यकारी संचालक एस.व्ही.पाटील, कार्यकारी संचालक आर.ए.समुद्रे यांनी सभेची माहिती दिली. सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजूरी देण्यात आली. या सभेस उत्तमराव पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सतीश टोपे, डॉ. निसार देशमुख, नंदुभाऊ देशमुख, कल्याण सपाटे, श्रीराम जाधव, सुरेश औटे, पांडुरंग कथले, मुमताज भाई, नवाब भाई, जमील भाई, अरुण कळकटे, राजेंद्र हातोटे, अशोक शिंदे, किरण तारख, दीपक मरकड, भाऊसाहेब कनके, तात्यासाहेब चिमणे, संजय कनके, बाळासाहेब नरवडे, सिताराम लहाने आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वार्षिक सभेत ‘यांचा’ झाला गौरव..!

या सभेत उसाचे जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणारे शेतकरी दामोधर बापुराव औटे, उषा कृष्णा ढेरे, अनिरुद्ध काळे यांना विशेष गौरव मिळाला. तसेच, सुशील लिमकर, विजय पडवळ, राधेश्याम लाड, देवीदास कदम, विजय लिंगसे, गौरक्ष आंबरुळे, लक्ष्मण नरवडे, रोशनी भालेकर, बाळासाहेब कदम, परमेश्वर मोकळे, दत्ता खोजे यांना ‘उस तोड व वाहतूक गौरव पुरस्कार’ देण्यात आले. मृत सभासद मुरलीधर काळे यांच्या वारस आश्राबाई काळे यांना एक लाख विमा धनादेश देण्यात आला.

कर्मयोगी टोपे यांची जयंती साजरी

अबंड तालुक्यातील समर्थ सहकारी साखर कारखाना येथे माजी मंत्री राजेश टोपे यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे यांची 18 सप्टेंबर रोजी जयंती साजरी केली. यावेळी कर्मयोगी स्मारकामध्ये कै. अंकुशराव टोपे व कै. शारदाताई टोपे यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे,एस.एस. हुलमूक,प्रशांत शेळके, प्रशांत बर्डे, विश्वंभर मचे, कर्डिले, समर्थ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here