नवी दिल्ली : भारतात कोरोना महामारीच्या रुग्णांची संख्या सातत्याने घसरत आहे. देशात सलग बाराव्या दिवशी कोरोनाचे १५००० हून कमी नवे रुग्ण आढळले आहेत गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमित ११ हजार ६७ रुग्ण आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर २४ तासांत ९४ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
दरम्यान देशातील लसीकरण अभियानाने वेग घेतला असून आतापर्यंत जवळजवळ ६६ लाख लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.












