नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना महामारीचे नवे ११ हजार ७१३ रुग्ण आढळले आहेत. तर यादरम्यान कोरोनामुळे ९५ जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दिवसभरात १४ हजार ४८८ रुग्ण बरे झाले आहेत. आता भारतात कोरोनाचे एकूण १ कोटी ८ लाख १४ हजार ३०४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १ कोटी ५ लाख १० हजार ७९६ रुग्ण कोरोनापासून पूर्ण बरे झाले आहेत. तर कोरोना महामारीने आजवर देशातील १ लाख ५४ हजार ९१८ जण मृत्युमुखी पडले आहेत.


















