हवाना : क्यूबाचा साखर उद्योग पुन्हा सर्वात खराब हवामानाच्या दिशेने जात असल्याचे प्रसार माध्यमातील वृत्तामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आर्थिक विकास कोलमडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्तरावर असलेला या उद्योगाचा नावलौकीकही धोक्यात आला आहे. २०२२ मधील पिक गेल्या वर्षीच्या निच्चांकी स्तरापेक्षाही खूप कमी असेल अशी शक्यता आहे. यंदाचे साखर उत्पादन सरकारच्या ९,००,००० टनाच्या उद्दीष्टापेक्षाही किमान ३० टक्क्यांनी कमी असेल अशी शक्यता आहे.
१९०८ नंतर गेल्या वर्षी ८,००,००० टन उत्पादन हे सर्वात कमी उत्पादन होते. साखर उद्योग हा क्यूबामध्ये कधीकाळी गौरवशाली होता. त्यातून रम उत्पादन आणि या द्वीपातील ग्रामीण भागात परकीय चलन तसेच रोजगार निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका या उद्योगाची होती. अमेरिकेचे नव्याने कडक निर्बंध आणि कोरोन महामारीमुळे सरकार या क्षेत्रातील गरजांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरली आहे. यामध्ये इनपूट, सिंचन आणि स्पेअर पार्ट्स यांचा समावेश आहे. गळीत हंगाम दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. तो मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालतो. मात्र, या वर्षी बहूसंख्य साखर कारखाने डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सुरू झाले. त्यांच्यासमोर स्पेअर पार्ट्सची कमतरता होती.क्यूबामध्ये साखरेचा देशांतर्गत खप ५,००,००० टन आहे. तर साखर विक्री ४,००,००० टन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. आशियाई राष्ट्रातील एका स्थायी कराराचा हा भाग आहे.















