सहारणपूर (उत्तरप्रदेश): कोरोना वायरसच्या बाबतीत जिल्ह्यातील प्रमुख साखर उद्योग अधिक गंभीर आहे. साखर कारखान्यांनी सामान्य जनतेला मदतीसाठी हात पुढे केले, तसेच आपले स्वत:चे कर्मचारी आणि शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी देखील कटीबद्धता दाखवली आहे.
या संकटकाळी दया साखर कारखाना गागलहेडी यांनी आपल्या प्लांट बरोबरच यार्ड आदी क्षेत्रालाही निर्जंतुक (सॅनिटाइज) करण्याचे काम केले आहे. दया कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य कांबोज म्हणाले की, कोरोनापासून बचावासाठी पूर्ण प्लांट ला सॅनिटाइज केला आहे. तसेच कारखान्यात येणार्या शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी देखील योग्य त्या सोई, सुविधा पुरवल्या आहेत.


















