कोल्हापूर शहरात ऊस वाहतुकीला दिवसा प्रवेश बंद

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी दिवसा शहरात प्रवेश करू नये, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी निश्चित केलेल्या मागनिच वाहतूक सुरू ठेवावी. ही वाहतूक रात्री १० ते पहाटे सहा या वेळेतच करण्याच्या सूचना आहेत. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीचालकांनी मोठ्या आवाजातील स्पीकर लावणे टाळावे, ट्रॉलीच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्याचा आदेशही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

राजाराम कारखान्याकडे जाणारी वाहने तावडे हॉटेलकडून येणारी वाहने ताराराणी पुतळा उजवीकडे वळण, सदर बाजार, अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मेन रोडमार्गे जावे. बालिंगाकडून येणारी वाहने फुलेवाडी, रंकाळा टॉवर, गंगावेस, शिवाजी पूल, सी. पी. आर. सिग्नल चौक, महावीर कॉलेज मार्गे जातील. भोगावती व कळंब्याकडून येणारी वाहने नवीन वाशी नाका, कळंबा रिंगरोड, कळंबा, संभाजीनगर, ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद कार्यालयाकडून राजाराम कारखान्याकडे जातील.

कुडित्रे कारखान्याला जाणारी वाहने तावडे हॉटेलकडून येणारी वाहने ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद कार्यालय, हेडपोस्ट ऑफिस, महावीर कॉलेज, सीपीआर चौक, शिवाजी पूल, गंगावेस, रंकाळा स्टँड, रंकाळा टॉवर, फुलेवाडी मार्ग डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

बिद्री कारखान्याकडे जाणारी वाहने ताराराणी पुतळा डावे वळण, टेंबलाई उड्डाण पूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर चौक, रिंगरोड, संभाजीनगर, कळंबामार्गे बिद्री कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

भोगावती कारखान्याकडे जाणारी वाहने ताराराणी पुतळा, हायवे कॅन्टीन चौक, संभाजीनगर, कळंबा साई मंदिर, रिंगरोडमार्गे कारखान्याकडे जातील.

दत्त दालमिया कारखान्याकडे जाणारी वाहने ताराराणी पुतळा, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल, हेडपोस्ट ऑफिस, महावीर कॉलेज, सीपीआर चौक, शिवाजी पूलमार्गे दालमिया कारखान्याकडे जातील.

कर्णकर्कश हॉर्न, ओव्हर लोडिंगवर कारवाई..

ऊस वाहतूक ट्रॅक्टरचालकांकडून मोठ-मोठ्याने स्पीकर वाजविण्यात येतात. तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार होता. असे प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. ट्रक, ट्रॉली, बैलगाडीत क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरू नयेत, वाहनांच्या पाठीमागील बाजूस वाहनधारकांना सहज दिसतील, असे रिफ्लेक्टर असणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

…हा मार्ग २४ तास खुला

ऊस वाहतूकदारांसाठी फुलेवाडी नाका, चिवा बाजार, कळंबा, हॉकी स्टेडियम, हायवे कॅन्टीन चौक, कोयास्को चौक, उचगाव, राष्ट्रीय महामार्ग, शिये, कसबा बावडा, शिये, भुये, वडणगे हा मार्ग २४ तास खुला असेल. या मार्गावर वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here