माळेगाव साखर कारखाना निवडणुकीबाबत १२ जूनपूर्वी निर्णय : शरद पवार यांची घोषणा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी तुमच्यासोबत आहे. तुमचा होकार असले तर १२ जूनपूर्वी योग्य तो निर्णय घेतो. त्यासाठी माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांनी गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी इच्छुक उमेदवार व कार्यकत्यांची बैठक बोलविली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या कारखान्यावर शेतकऱ्यांचा प्रपंच अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे, असे पवार म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने माळेगावची निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगितले. माळेगावच्या निवडणुकीत पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असले, असे त्यांनी सांगितले. इच्छुक उमेदवारांचा परिचय सुशील जगताप यांनी करून दिला. उपस्थितांचे स्वागत गौरव जाधव यांनी केले. यावेळी युगेंद्र पवार, सतीश खोमणे, सदाशिव सातव, अँड एस. एन. जगताप, भगतसिंग जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. पवारसाहेब जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल,’ असे बैठकीच्या सुरवातीलाच कार्यकर्ते व इच्छुकांनी जाहीर केले. या संस्था प्रगतिपथावर ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here