लंडन : ट्रॉपिकल रिसर्च सर्व्हिसेसने आपल्या अहवालात २०२१-२२ या हंगामासाठी जागतिक अतिरिक्त साखर उत्पादनाच्या आपल्या अंदाजात मोठी घट दर्शविली आहे. तर चालू २०२०-२१ या हंगामातील साखर उत्पादनात वाढ दर्शविण्यात आली आहे.
टीआरएसने फेब्रुवारीमध्ये ५.१८ मिलियन टनाच्या आपल्या पुर्वीच्या अंदाजात बदल करून आता २.४८ मिलियन टन अतिरिक्त साखरेचा अंदाज वर्तविला आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक उत्पादन १८८.९४ मिलियन टन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यापूर्वी १९१.५१ मिलियन टन अतिरिक्त साखर उत्पादनाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर फेब्रुवारीतील जागतिक साखरेचा खप १८४.३८ मिलियन टनाच्या पूर्व अंदाजात १८४.५० मिलियन टन इतका कमी बदल करण्यात आला आहे.
टीआरएसच्यावतीने सांगण्यात आले की, आशियामध्ये आणि खास करून भारतात कोरोना महामारीच्या नव्या लाटेमुळे साखरेचा खप आमच्या सध्याच्या अनुमानापेक्षा कमी आहे. भारत, मध्य आणि दक्षिण ब्राझिल तसेच युरोपिय संघामध्ये २०२१-२२च्या उत्पादनाच्या अंदाजात घट होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.












