लखनौ : नव्या हंगामातील ऊसाचे गाळप सुरू झाले आहेत. मात्र, सरकारने अद्याप उसाच्या राज्य समर्थन दराची (एसएपी) घोषणा केलेली नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. यादव यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारच्या अन्यायामुळे, महागाई आणि भ्रष्टाचारामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे अशी टीका यादव यांनी केली. यादव यांनी येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आणि धनदांडग्यांच्या, बड्या व्यावसायिक घराण्यांच्या हिताची आहेत. ते म्हणाले की, नव्या हंगामात ऊसाचे गाळप सुरू झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप एसएपी जाहीर केलेला नाही. गेल्या हंगामातील ऊसाची थकबाकीही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.















