धाराशिव : विठ्ठलसाई कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५-२६ साठीचे रोलर पूजन माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काशी, श्रीशैल्यम व उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, उपाध्यक्ष सादिक काझी, कारखान्याचे संचालक केशव पवार, शरणप्पा पत्रिके, विठ्ठलराव बदोले, शब्बीर जमादार, विठ्ठलराव पाटील, राजीव हेबळे, दिलीप भालेराव, रामकृष्णपंत खरोसेकर, ॲड. संजय बिराजदार, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे आदी उपस्थित होते.
बसवराज पाटील म्हणाले की, आगामी २०२५-२६ या हंगामामध्ये कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे वेळेवर गाळप केले जाईल. त्यासाठी सक्षम ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे. कारखाना मशिनरी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येत असून ऊस उत्पादक व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे. यावेळी सुभाष राजोळे, दिलीप पाटील, मंगल गरड, इरम्मा स्वामी, शिवमूर्ती भांडेकर, शिवलिंग माळी, करंजकर महाराज (सोलापूर), बिलाल काझी, प्रा. शौकत पटेल, युसूफ मुल्ला, देवेंद्र कंटेकुरे, गणेश अंबर, साधूराम हिंडोळे, सतीश बालकुंदे, कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.