नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्ष समाप्त करण्याचा प्रयत्न भारत करीत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. भारत जागतिक अन्नधान्य कार्यक्रमासह अनेक देशांसोबत गहू, साखर पुरवठ्याबाबत चर्चा करीत आहे. कारण, युक्रेन संघर्षामुळे अन्नधान्य पुरवठा आणि किमतीमधील उतार-चढाव कमी करण्याची गरज आहे. युक्रेन युद्धामुळे जगातील अस्थिरता कमी करण्यासाठी भारत काय करीत आहे या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, भारत हे युद्ध समाप्त व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे.
युक्रेनने औषधांसाठी आमच्यासोबत संपर्क साधला आहे. औषधांची एक शिपमेंट लवकरच पाठवली जाईल. ते म्हणाले की, युद्धामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि मर्याती पुरवठ्यासह ऊर्जा सुरक्षेवर परिणाम झाला आहे. भारताच्या रशियाकडून इंधन खरेदीबाबतच्या प्रश्नावर, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकारांनी यापेक्षा रशियाकडून ऊर्जा पुरवठ्याच्या युरोपच्या खरेदीवर लक्ष दिले पाहिजे. युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या अन्न सुरक्षेच्या मुद्यावर ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी भारताकडून गरजू देशांना गहू, साखर पुरवठ्यावर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती बायडेन यांच्यादरम्यान व्हर्च्युअल समिटवेळीही याबाबत चर्चा झाली आहे.















