भारतात आर्थिक असमानता चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. अलिकडेच आलेल्या एका अहवालानुसार गेल्या वर्षभरात देशात अब्जाधिशांची संख्या वाढून १४२ वर पोहोचली. या अब्जाधिशांकडे देशातील ४० टक्के लोकसंख्येपेक्षाही अधिक पैसे आहेत. तर दुसरीकडे २०२१ मध्ये ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अधिवेशनाच्या आधी जाहीर झालेल्या Oxfam अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवानानुसार २०२१ मध्ये अब्जाधिशांची संख्या आधीच्या १०२च्या तुलनेत १४२ झाली आहे. या १४२ अब्जाधिशांची संपत्ती वाढून ७२० बिलियन डॉलर झाली आहे. देशातील ४० टक्के गरीब लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीपेक्षाही ही जादा संपत्ती आहे. अब्जाधिशांची संपत्ती वाढली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोक त्रस्त आहेत. त्यामुळे कोट्यवधी लोकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे २०२१ मध्ये ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटल्याचे अहवालात म्हटले आहे. या ऑक्सफेम अहवालानुसार अमेरिका आणि चीनपेक्षाही अधिक अब्जाधिश भारतात आहेत. फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्सर्लंडपेक्षाही अधिक अब्जाधिश भारतात आहेत. तर भारतात नव्हे तर जगभरात असमानतेमुळे चार सेकंदाला एक मृत्यू होत असल्याची स्थिती आहे.


