ओंकार ग्रुपतर्फे खा. पार्थ पवार यांचा सन्मान, बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केली साखर उद्योगावर चर्चा

पुणे : पार्थ पवार यांची राज्यसभेवर खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सध्या साखर उद्योगासमोर असलेल्या अडचणी, ऊस उत्पादकांच्या समस्या, साखरेचे दर, निर्यात धोरण, तसेच उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत बाबूराव बोत्रे-पाटील यांनी पवार यांच्याशी चर्चा केली.

खासदार पार्थ पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत साखर उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक त्या पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे जीवन साखर उद्योगावर अवलंबून असल्याने या क्षेत्राच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेच्या माध्यमातून पार्थ पवार राज्य आणि देशाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास बाबूराव बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here