पुणे : जिल्ह्यात शेतकऱ्यांना ३,९७५ कोटींची एफआरपी अदा, सहा कारखान्यांनी दिली १०० टक्के ऊसबिले

पुणे : चालू गळीत हंगामात यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३ हजार ९७५ कोटी ५ लाख रुपयांची ऊस बिले अदा केली आहेत. या हंगामात जिल्ह्यातील १५ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीपोटी (एफआरपी) एकूण ४ हजार ४८९ कोटी १४ लाख रुपये देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४०१ कोटी ८५ लाख रुपयांची एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक १२८ कोटी ९९ लाख रुपये थकीत एफआरपी भीमा सहकारी साखर कारखान्याची आहे. तर ही रक्कम देय एफआरपीच्या केवळ ३५.५५ टक्क्यांइतकी आहे. भीमा कारखाना साईप्रिया शुगर्सकडून चालविला जातो. कारखान्याची देय एफआरपी २६३ कोटी ६१ लाख रुपये आहे. कारखान्याने त्यातील १३४ कोटी ६२ लाख रुपयेच शेतकऱ्यांना दिलेले आहेत. तर काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. साखर आयुक्तालयथकीत एफआरपीप्रश्नी या कारखान्याबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here