‘दौलत’ सभासदांच्याच मालकीचा ठेवण्यासाठी प्रयत्न : मानसिंग खोराटे

कोल्हापूर : ‘हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याकडून थकीत रकमेच्या वसुलीसाठी ‘एनसीडीसी’ने कारखान्याच्या मालमत्तेची लिलाव प्रक्रीया सुरू केली आहे. मात्र, यामध्ये आपण कदापि सहभाग घेणार नाही. हा कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहावा ही आपली सुरुवातीपासूनची इच्छा असून, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

खोराटे म्हणाले, ‘हा कारखाना चालवायला घेतल्यानंतर पहिली बैठक कारखानास्थळावरील गणपती मंदिरात झाली होती. त्यावेळी मी सभासद, शेतकरी, कामगारांसमोबर बोलताना ३९ वर्षांत हा कारखाना कर्जमुक्त करुन तो पुन्हा सभासदांच्या ताब्यात देणार असल्याचे वचन दिले आहे. त्यापासून कधीच बाजूला जाणार नाही. लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन हा कारखाना विकत घेण्याची माझी ऐपत आहे. मात्र, मी तसे करणार नाही. त्यातूनही तो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने घेतल्यास माझा नाईलाज असेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here