दुबई : ईजिप्तमध्ये यंदाच्या हंगामात साखर उत्पादन २.८६ मिलियन टन होण्याची शक्यता आहे अशी माहिती ईजिप्तच्या कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. देशाच्या ९० टक्के मागणीची पूर्तता यातून होणार आहे. शुगर क्रॉप काउन्सिलचे प्रमुख अब्देल गवाद यांनी सांगितले की, ईजिप्तला या हंगामात किरकोळ प्रमाणात साखर आयात करावी लागणार आहे.
देशात जून महिन्यात आयातीवरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यानंतर पांढरी आणि कच्ची साखर आयात करणे शक्य झाले आहे. अब्दूल गावेद यांनी सांगितले की, ईजिप्तच्या दक्षिणेकडे असलेल्या मिन्या येथील नव्या साखर रिफायनरीत मार्च अथवा एप्रिल २०२२ मध्ये ४,५०,००० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर देश साखरेची निर्यात करू शकतो.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

















