निवडणुकीचा बिगुल : घुले, मुळा, वृध्देश्वर कारखान्यांची आज प्रसिध्द होणार प्रारुप मतदारयादी

अहिल्यानगर : मुळा, लोकनेते मारुतराव घुले पाटील व श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या तीनही कारखान्यांची प्रारुप मतदारयादी आज (दि.५) प्रसिध्द होणार आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) संजय गोंदे यांनी या तीनही कारखान्यांच्या मतदारयादींचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुरुवारी (दि.५) प्रारुप मतदारयादी प्रसिध्द होणार आहेत.

या याद्या जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार पाथर्डी, नेवासा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच संबंधित सहकारी साखर कारखाना कार्यालयात प्रसिध्द होणार आहेत. या याद्यांवर १६ मार्चपर्यंत हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या हरकतींवर २७ मार्च रोजी अहिल्यानगरातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) सुनावणी होणार आहे. त्यानंतर १ एप्रिल रोजी या तीनही कारखान्यांची अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here