निवडणूक निकाल अपडेट : छत्रपती सहकारी कारखान निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पॅनेल निर्णायक आघाडीवर

पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (19 मे) बारामतीतील प्रशासकीय भवनातील जलसंपदा विभागाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू झाली. सुरुवाती पासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कृती समितीचे पॅनल असलेल्या श्री जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. यामध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी नाव जाहीर केलेले पृथ्वीवर जाचक व शरद शिवाजी जामदार या दोन उमेदवारांनी प्रतिस्पर्धी छत्रपती बचाव पॅनलवर निर्णय आघाडी घेतली होती. हे उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर होते.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री जय भवानी माता पॅनल प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास यावेळी गुजर यांनी व्यक्त केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्या राजकारणातील सहकाराच्या वर्चस्वाची कसोटी पाहणारी ही निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीचे संयुक्त श्री जय भवानी माता पॅनल निर्णायक आघाडीवर आहे. या पॅनलचे पहिल्या गटातील सर्व उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.

इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे मतदान रविवारी १८ मे ला पार पडले होते. आज (19 मे )संध्याकाळी दहा वाजेपर्यंत निकालाची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी ळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील समोरासमोर आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या लगावल्या होत्या. अजित दादा पाटील त्यांना खास शैलीमध्ये पाटील साहेब नमस्ते, लक्ष असूद्य आमच्याकडे असा म्हणाले होते. यावर पाटलांनीही आमचंं लक्ष तुमच्याकडेच असल्याचं म्हणत पाटलांनीही कडक उत्तर दिले होते. दोघांनी मारलेल्या कोपरखळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज निकाल स्पष्ट होणार असून रात्री कोणता पॅनल बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here