शाहजहांपूर : ऊस विकास परिषदेच्यावतीने राजनपूर गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. येथे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा रोगापासून कसा बचाव करावा याचे मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ ऊस निरीक्षक उमाकांत द्विवेदी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना उसाची तोडणी करताना सावधगिरी बाळगावी. जमिनीच्या पोषक तत्त्वांसह उर्वरीत निगा कशी राखावी याचे त्यांनी मार्गदर्शन केले. उसाच्या प्रजातीची निवड करताना त्यावरील लाल सड रोगापासून कसा बचाव करता येईल याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन प्रक्रियेचा वापर केल्यास कमी पाण्याची गरज भासेल. इंधनाची बचत होईल. डॉ. अनेक सिंह यांनी मृदा तपासणी, पिकाच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देताना पाचट जाळू नये असा सल्ला दिला.
यावेळी शेतकरी सुमित गंगवार, नेमचंद्र, धर्मेंद्र कुमार, सुंदरलाल, रामपाल, हरद्वारी लाल, मनोज मिश्रा, राकेश राठोड, मुकेश चंद्र, भगवान सरन, नीतीश कुमार, विद्यासागर आदी उपस्थित होते.












