भारतीय किसान युनीयनच्या तोमर गटाच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची थकीत बिले मिळण्यासाठी बजाज शुगर मीलच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्याचे युनिट हेडना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
धरणे आंदोलनात बोलताना भाकियूचे प्रदेशाध्यक्ष चौधरी सुदेशपाल म्हणाले, साखर कारखान्याला आपले धोरण बदलावे लागेल. १० फेब्रुवारीपर्यंत व्याजासह थकबाकी मिळालं पाहिजे. नियमित तोडणी पावत्या, बैलगाडीचे टोकन, ऊस वजन करण्याची व्यवस्था कारखाना प्रशासनाने सुरळीत करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या युनिट हेड यशराज सिंह यांनी सांगितले की, १५ फेब्रुवारीपर्यंत कारखाना शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले अदा करेल. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की जर १५ फेब्रुवारीपर्यंत ऊस बिले मिळाली नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्यासह डिस्टीलरीला टाळे ठोकले जाईल. यावेळी मनवीर सिंह, नारायण सिंह, सत्यपाल सिंह, अभिमन्यू, सुखबीर पहिलवान, अनिल कुमार, ओंकार सिंह, सोनू, असलम, शाकिर, अक्रम, कार्तिक कांबोज, अस्लम आदी उपस्थित होते.











