भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशीतील मोठी लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. मात्र अन्न उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. खरेतर आपण शेतकऱ्यांचे दररोज आभार मानले पाहिजेत. प्रत्येक देशवासीयाला त्यांच्या निस्वार्थ योगदानामुळे अन्न पुरवले जाते. शेतकऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस भारतीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसर, माजी पंतप्रधान आणि शेतकरी मित्र नेते चौधरी चरण सिंह यांची आज जयंती आहे. स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांनी भारताचे पंतप्रधान असताना शेतकऱ्यांची स्थिती व दिशा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. चौधरी चरण सिंह हे स्वतःदेखील शेतकरी कुटुंबातून आले होते. त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या समस्यांची जाण होती. देशातील सर्वोच्च पदावर विराजमान होऊनही त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुधारात्मक कार्य सुरूच ठेवले. चौधरी चरणसिंग यांनी भारत शेतकऱ्यांचा देश असल्याचे ओळखले होते. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कृषी क्षेत्राच्या विकासात आणि शेतकऱ्यांच्या हिताचे हे सर्व कायदे आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कृषी उत्पादने, बाजार, त्यांना सावकारांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कायद्यांची तयारी केली.















