नजीबाबाद : भारतीय किसान युनियनच्या मासिक बैठकीत नजीबाबाद साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या मागण्यांची सोडवणूक केली नाही तर शेतकरी आंदोलन करण्याचा मार्ग निवडतील. भाकियूचे विभाग अध्यक्ष अवनिश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ऊस समितीच्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या या मासिक पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अवनिश कुमार म्हणाले की, प्रचंड उन्हाळ्यामुळे शेतात पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. आता नजीबाबाद साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची एक महिन्यापूर्वी समाप्ती झाली आहे. मात्र, आतापर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले मिळालेली नाहीत. कारखान्याने शेतकऱ्यांना तातडीने ऊस बिले देण्याची गरज आहे. अवनीश कुमार यंनी भाकियूच्या सोळा जून रोजी आयोजित हरिद्वारमधील चिंतन शिबिरात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. यावेळी अजय कुमार, प्रमोद कुमार, हुकम सिंह, महेंद्र सिंह, नरदेव सिंह, बाबूराम, मोहित, मुकेश, डॉ. शरीफ, सुरेंद्र, साजिद, राजीव राठी, बिट्टू आदी उपस्थित होते.


















