कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जात टाकू नका : शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील

कोल्हापूर : राज्य शासन, राज्य बँक, राज्य साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस पीकवाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. आधीच शेतकरी कर्जात अडकलेला आहे. कर्जमाफी लवकर होताना दिसत नाही. तरीही शेतकऱ्यांना पुन्हा कर्जात टाकून काय फायदा होणार, असा प्रश्न शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी उपस्थित केला. हा शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. याविरोधात आजपासून राज्यव्यापी शेतकरी प्रबोधन मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, यापूर्वीही आसवनी, सहवीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार असे आमिष दाखवले गेले. परंतु ऊसउत्पादक शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षे २७०० रुपये भरून ३ हजार रुपये प्रतिटन रक्कम मिळत आहे. ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. ऊस उत्पादनात वाढ होणार असे आमिष शरद व अजित पवार दाखवत आहेत. त्याला सत्तेच्या मोहाने मुख्यमंत्री, राज्य शासन बळी पडत आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here