अंबाला : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नारायणगड साखर कारखान्याने ३१ डिसेंबरपर्यंत २७.७० कोटी रुपयांहून अधिक ऊस बिलांची थकबाकी न दिल्याबद्दल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कारखान्याकडे शेतकऱ्यांची गेल्या हंगामातील बिले थकीत आहेत.
Tribuneindia.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा यांनी सांगितले की, कारखाान्याने पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत, अशी स्थिती नाही. यापूर्वी काही वर्षांपूर्वी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी वारंवार आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले होते. उशीरा उसाचै पैसे मिळत असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना आपले पीक स्वस्त दरात क्रशरला विकावे लागले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळविण्यासाठी ऊस क्रशरला विक्री करण्यासह यमुनानगर कारखाना आणि पंजाबच्या कारखान्यांना आपले पिक विकावे लागले आहे.
उप जिल्हाधिकारी आणि कारखान्याचे सीईओ नीरज यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरपर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. नव्या हंगामातील उसाचे पैसे एक जानेवारीपासून देण्यात येतील.












