सांगली : यशवंत शुगरच्या कार्यस्थळावर आगामी, २०२४ – २५ या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या यंत्रणेच्या कराराचा प्रारंभ करण्यात आला. भारती शुगरचे सर्वेसर्वा महेंद्र लाड, भारती शुगरचे अध्यक्ष ऋषिकेश लाड व तोडणी वाहतूक कंत्राटदार, वाहन मालक यांच्या हस्ते करारपत्रांचे पूजन करण्यात आले. करार केलेल्या पहिल्या नऊ वाहन मालकांचा महेंद्र लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यशवंत शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महेंद्र लाड म्हणाले की, ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी सक्षम तोडणी यंत्रणा उभी करणार आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या उसाच्या नोंदी घेण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कारखान्याच्या शेती विभागाकडे कराव्यात. तोडणी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या वाहन मालकांनी आपले करार कारखान्याकडे करावेत. फायनान्स मॅनेजर प्रवीण पाटील, चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी गोरखनाथ निकम, ऊस पुरवठा अधिकारी विशाल पाटील, सुजित मोरे, एचआर असिस्टंट प्रसाद सुतार, सूर्यकांत पाटील, वाहन मालक कृष्णात पाटील, दुर्योधन सावंत, सचिन तुपे, संपतराव आरबुने, निशिकांत आरबुने, किशोर धर्माधिकारी, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.












