म्हैसूर : जिल्ह्यातील के. टी. नरसीपूर तालुक्यातील कुरुबलाहुंडी गावात लागलेल्या आगीत ५० लाख रुपयांचे उसाचे पीक जळून खाक झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सुमारे २० एकर क्षेत्रातील पिकाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भीषण आगीने अनेक शेतांना वेढले होते. या आगीतून ऊस तोडणी करणारे मजूर आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. अतिशय कमी वेळात २० एकरातील पीक जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.















