भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी सुरू

आणि परस्पर फायदेशीर भागीदारी पुढे नेण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या मार्च 2025 मधील भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन यावर चर्चा आधारित आहे. 16 मार्च 2025 रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंड सरकारचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकक्ले यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान मुक्त व्यापार करार चर्चेची औपचारिक सुरुवात करण्यात आली होती.

या फेरीतील वाटाघाटी – वस्तूंचा व्यापार, सेवा व्यापार आणि उत्पत्तीचे नियम यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहेत. दोन्ही देशांची प्रतिनिधीमंडळे या आधीच्या फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रगतीवर आधारित ,अद्याप प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर एकमत साधण्यासाठी तसेच मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक प्रयत्न करत आहेत.

दोन्ही देश शाश्वत वाढ आणि परस्पर समृद्धीला चालना देणारा, दूरदर्शी आणि सर्वसमावेशक व्यापार आराखडा विकसित करण्यास वचनबद्ध असल्याचा भारत आणि न्यूझीलंड यांनी पुनरुच्चार केला.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here