नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती उच्चांकी स्तरावर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज, २७ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू केले आहेत. देशांतर्गत बाजारात डिझेल सलग दुसऱ्या दिवशी महागले आहे. तर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिझेलच्या दरात २५ पैसे प्रती लिटर वाढ करण्यात आली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोल, सलग २२ व्या दिवशी १०१.१९ रुपये प्रती लिटर दरावर स्थिर आहे. तर डिझेलच्या दरात २५ पैसे प्रती लिटर वाढीसह ८९.३२ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. डिझेलच्या दरात गेल्या चार दिवसांत तीनवेळा वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात डिझेल ७० पैसे प्रती लिटर महागले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैसे आणि २६ सप्टेंबर रोजी २५ पैसे प्रती लिटरची वाढ केली होती. आज, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ डिसेंबर रोजी पुन्हा २५ पैशांची वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत डिझेल ७० पैशांनी महागले आहे. तर पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. एक सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात १५-१५ पैशांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे पेट्रोल या महिन्यात ३० पैशांनी स्वस्त झाले आहे. विविध राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर केंद्र आणि राज्य सरकारच्या करांशिवाय वाहतूक खर्चामुळे वेगवेगळे असतात.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावर पेट्रोल-डिझेलचे दर इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांकडून अपडेट केले जातात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link













