सांगे: गोवा राज्याचे वार्षिक बजेट विधानसभेत सादर करताना सरकारने संजीवनी साखर कारखान्याला ‘संजीवनी’ देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गोव्यातील एकमेव साखर कारखाना बंद झाल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले होते.सरकार ने कारखाना बंद झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानही दिले होते. राज्यातील एकमेव कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. शेतकऱ्यांकडून सातत्याने साखर कारखाना पुन्हा सुरु करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.
गोमंतकमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कारखाना दुरुस्ती काम हाती घेतले म्हणजे कारखाना सुरू होईल म्हणजे चुकीचं ठरेल. कारण शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी ऊस उचल करण्याची हमी हवी असते. त्यासाठी कृषी खात्याने हमी दिल्यास बॅंक, वित्तीय संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करीत असतात. जोपर्यंत लेखी हमी सरकार देणार नाही, तो पर्यंत कोणीही कर्ज पुरवठ्याची जोखीम स्वीकारणार नाही, याची नोंद घेणे आवश्यक आहे.


















